उस्मानाबाद, माझ्या वडिलांचे जन्म गाव, मी माझी कर्मभूमी मानतो. अमेरिकेमध्ये शिकत असताना तिथल्या खेड्यापासून शहरापर्यंत समान प्रमाणात असलेल्या facilities - सेवा सुविधा पाहिल्या की तेव्हा कुठेतरी मनाला बोच लागून राहायची की आपल्या भारत देशात ही तफावत का जाणवते. काही शहरे ही खूप advanced developed - प्रगत आणि काही शहरांना विकासाचा मागमूसही नाही, गावांची परिस्थिती अजून टोकाची.
तेव्हाच मनात एक पक्का निर्णय केला होता, अमेरिकेतील समाजकारणाचा, राहाणीमानाचा जेवढा #अभ्यास करता येईल तितका करून त्याचा काही अंशी उपयोग आपल्या #कर्मभूमीमध्ये येऊन करायचा.

गेले काही वर्ष याच इच्छेने धेय्याने मी #तुळजापूर-उस्मानाबाद भागात विकासाच्या दृष्टीने जेवढे कार्य करता येईल तेवढे करत आहे. गेल्या साडेचार वर्षात देशाची विकासाच्या दृष्टीने जी घोडदौड चालू आहे त्याकडे पाहता हे #भारतीय जनता पक्षाचे #सरकार सर्व स्तरावर समतोल विकास साधण्याच्या प्रयत्नात आहे याबाबत कुणाला शंका असण्याचे काही कारण नाही. #उस्मानाबाद-तुळजापूर भागातील समस्या, विकासाच्या संधी यांचा सातत्याने मी गेले काही वर्ष अभ्यास करत आहे. #शहर-ग्रामीण भागातील रस्ते व इतर सुविधा यांच्या दृष्टीने #काम करण्याची गरज होती, ही गरज #ग्रामविकास खात्या पर्यंत पोचवण्यात व त्यांच्याकडून ग्रामीण भागातील गावंतर्गत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रु. 2 कोटी निधी मिळवण्यात मला जे यश आले ती मी तुळजापूर मतदार संघातील नागरिकांच्या सेवेसाठी मिळालेली संधी मानतो.
#सहकार #मंत्री सुभाष देशमुख आणि #ग्रामविकास #मंत्री पंकजाताई मुंडे-पालवे यांच्या पाठिंब्यामुळे आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी एक मंत्री म्हणून त्यांच्या असलेल्या स्पष्ट व्हिजनमुळे हे शक्य झाले हे इथे प्रामुख्याने सांगायला हवे. ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने त्यांचे व्हिजन कायमच एक #positive support ठरले आहे.
हा #निधी योग्य पद्धतीने वापरला जाईल आणि नागरिकांना त्यांचा पुरेपूर फायदा होईल याकडे मी जातीने लक्ष घालीन, यासाठी मी वचनबद्ध आहे.
तुळजापूर-उस्मानाबाद शहर व #ग्रामीण भागाच्या प्रगती व विकासाच्या कार्याला वाहून घेण्याचा माझा निर्णय ठाम आहे, त्यासाठी मला गरज आहे ती या भागातील नागरिकांच्या साथीची. तुमचा support-पाठिंबा माझी जिद्द व ताकद लाखो पटीने वाढवेल.
संस्कृती जपू जुनी...
मात्र नवे विचार, नव्या कल्पनांचा इतिहास रचू नवा...